जयश्री,

कवयित्री असल्यामुळे 'जगतेच'... छे छे असं अजिबात नाही, मात्र या मुसलसल गझलेत ते जास्त शोभून दिसेल असं वाटलं म्हणून. (मीसुद्धा एक स्त्रीप्रधान गझल लिहिली होती पूर्वी: आज मी)

आधी म्हटल्याप्रमाणे ही गझल संगीता जोशींच्या गझलांच्या जवळ जाणारी वाटली*, त्यामुळेही 'जगतेच' म्हणावंसं वाटतंय.

- कुमार

*संगीता जोशींचे काही अशा धाटणीचे शेरः

सोसताना हासण्याचा प्रश्न होता
चेहरा सांभाळण्याचा प्रश्न होता

या हवेला मी कशाला गंध मागू?
श्वास चालू राहण्याचा प्रश्न होता

बंद ओठांनी सजाही मान्य केली
जे खरे ते बोलण्याचा प्रश्न होता

किंवा

माणसांचे रान येथे राहणे आता नको
सर्व काटेरीच वाटा चालणे आता नको

दूर त्या आकाशवेली, दूर ती तारा-फुले
हे असे आभासवाणे चांदणे आता नको