मत स्वातंत्र्य दुतर्फी आहे, असावे. मूठभर पैसा जमवणारे जेव्हा क्रिकेट मॅच मुद्दाम हरवतात तेव्हा भारत हरला असे म्हटले जाते. भारताचे नाक कापले असेच म्हटले जाते. असे टाहो फोडून सांगणार्या टीव्ही वाल्यांना बक्षीस ही मिळते. मला जेव्हा घाऊक मराठी / भारतीय समजून घाऊक पंजाबी, केरळी, मद्रासी, ओमानी, अरब, इंग्रज, अमेरिकी वागणूक देतो आणी दिली गेली तेव्हा मी माझे मत स्वातंत्र्य वापरले.
तसेच आज शिकलेले प्रमाण पत्र मिळवलेली मुले - मुली घटस्फोट घेणारे जास्त आहेत.सासू सासर्याना त्रास देणारी जास्त आहेत. शिकलेली परप्रांतीय मुले मुली व आधीकारी वर्ग बिपीओ व कॉल सेंटर मधून आमच्या मराठी मुला मुलीनवर काय अत्याचार करतात ते जरा जवळून बघण्याचा प्रयत्न करा. आय एस अधिकारी, वकील, न्यायाधीश, राजकारणी - यादी फार मोठी आहे, जनतेची फसवणूक, लूट करण्यात अग्रस्थानी आहेत. मोठाली प्रमाण पत्रे मिळवलेलेच बॅंक आधीकारी मनमानी करून ग्राहकांना फसवीत आहेत. हे सगळे घाऊक रित्या चाललेले आहे.
तरीही माझा लेख वाचल्या बद्दल व प्रतिसाद दिल्या बद्दल अत्यंत आभारी आहे.