अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
स्थळ - तिबेटच्या पूर्व भागातील मारखम (Markham)हे गाव
तारीख - 16 मे 2009
कोणत्याही प्रकारची हिंसात्मक कारवाई करण्याची इच्छा नसलेला, पाचशेच्या वर संख्येचा, खेडूतांचा एक निशस्त्र जमाव, मारखम या गावाजवळ असलेल्या झोंगकाई आणि कंपनी(Jhongkai & Co.) यांच्या मालकीच्या खाणीकडे जाणार्या एकुलत्या एक रस्त्यावर जमा झाला आहे. या खाणीतून निर्माण होणार्या प्रदुषणामुळे या खेडूतांचे सर्व आयुष्यच बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. पाणी विषारी झाले आहे. जनावरांचे खूर झिजू लागले आहेत. दोन वर्षात 26 माणसे व 2460 जनावरे यमसदनाला गेली आहेत. ...
पुढे वाचा. : महात्माजींचे खरे वारस