मत स्वातंत्र्य दुतर्फी आहे, असावे.
हे तुमचं म्हणणं अगदी मान्य. तुमच्या मताचा मी आदर करतो.
हा प्रश्न जास्त-कमीचा नाहीये. वाईट माणसं (कमी अधिक प्रमाणात) सगळीकडेच असतात. पण म्हणून सर्वांनाच वाईट का म्हणायचं हा माझा प्रश्न आहे.
तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जाऊनही अगदी उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलं आहे. त्याबद्दल मला आदर, कौतुक, अभिमान वाटतो. पण याचा अर्थ ज्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला लागत नाही (उदा. शिकलेले लोक? ) ते सगळे वाईट असं कसं म्हणू शकतो आपण?
हल्लीच 'मनोगत'वर कुणी (नाव विसरलो, क्षमस्व) कात्रज घाटात 'कसाब' नावाचा एक चांगला मनुष्य भेटला आणि त्यानं गाडीतलं पेट्रोल काढून दिलं ही घटना लिहिली होती.
शिकलेली परप्रांतीय मुले मुली व आधीकारी वर्ग बिपीओ व कॉल सेंटर मधून आमच्या मराठी मुला मुलीनवर काय अत्याचार करतात
अत्याचार करणारे फक्त मराठी व्यक्ती बघूनच अत्याचार करतात असं वाटत नाही. आपण आदिलशाहीत/मोगलाईत राहत नाही.
शेवटी एवढीच पुन्हा तुम्हांला विनंती - तुमचे अनुभव खूप हृदयस्पर्शी आहेत, अनेक अगदी वैऱ्यावरही येऊ नयेत असे आहेत. त्यांतून माझ्यासारख्यांना शिकण्यासारखं खूप आहे. इतका सखोल जीवनाचा अनुभव घेणाऱ्या / मांडणाऱ्यानं अशी मनात कटुता ठेवावी हे पटत नाही; म्हणून हे लिहावंसं वाटतं.
- कुमार