मालिका खूप आवडली. खरे सांगायचे तर आधी मालिकेचे नाव वाचून मी ती वाचण्याची लांबणीवर टाकली होती. मात्र एकदा वाचायला घेतल्यावर सगळे भाग वाचून काढलेच, शिवाय लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमधले पुढचे भाग शोधून तेही वाचले, म्हणजे तुम्ही इथे भाग टाकण्याची वाट पाहायला लागू नये
लोकसत्तामधली मालिका संपली असली तरी इथे बारा भागांवर थांबू नका. शुभमच्या कॉलेज जीवनातले अनुभव, नेहाशी त्याचे टिकलेले/न टिकलेले संबंध, पालकांशी दूरवर राहूनही टिकलेला/न टिकलेला संवाद वगैरे अजून येऊ द्या. वाचण्यास उत्सुक आहे.
(मालिकेचे नाव मात्र अगदी आवडले नाही.)