प्रिय मंदार,
अभिप्रायाबद्दल आभार.
तुमचेही अभिनंदन. तुमचा धावक क्रमांक काय होता? 
हो, चिपबद्दल मला संयमने सांगितले होते. वरील लेख इतका मोठा होऊ लागला की मी काही भाग काढून टाकला त्यात ती माहिती होती. 
संयमचा फोटो मी इतर संस्थळावरील लेखात दिला आहे, पण मनोगतावर मला फोटो कसा चढवायचा ते सहजी दिसले नाही व त्यामुळे मी नुसता पिकसावरील दुवा दिला होता तो संपादीत झाला. 

"एका पत्रलेखकाचे दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये मॅरेथॉनवर टीका करणारे पत्र आले होते की ही धावाधाव कशासाठी? त्यातील काही मुद्दे बरोबर होते की यामुळे क्रीडा संस्कृती वाढणार नाही की खेळाडू घडणार नाहीत. "

मॅरेथॉनमधे धावाधाव केल्याने खेळाडू घडवायचे नसतात तर आरोग्याची काळजी घेणारे सर्वसामान्य नागरीक बनवायचे असतात असे मला वाटते.