यशवंत,

धन्यवाद! एकच शब्द वापरायचा प्रयत्न केला; पण शेवटी दोन वेगळे वापरावे लागले. तुम्ही सुचवलेला बदल 'ते' हा शब्दही रदीफमध्ये समाविष्ट असल्यामुळे करता येणार नाही.

अलका, सतीश,

धन्यवाद! तुम्हांला भाषांतर अधिक आवडलं हे वाचून खूप छान वाटलं; पण - फैज हा अतिशय महान (गालिबच्या पंक्तीत बसणारा) शायर आहे. त्याची मूळ गझल इतकी सोप्या शब्दांतली आहे, की भाषांतर करताना मलाच आपण अवजड शब्द वापरतोय असं सारखं वाटत होतं.

- कुमार