थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या वर्षी (इ.स. २००९) मे महिन्यात बऱ्याच सुट्या जोडून आल्या होत्या. महिन्याच्या सुरवातीच्या सुट्या जोडून आम्ही ऑस्ट्रियाला गेलो. महिन्याच्या शेवटीपण चार दिवस सलग सुट्टी मिळत होती. आत्ताच मोठ्या प्रवासावरून आलो असल्याने पुन्हा कुठे जायचं का नाही हे ठरत नव्हतं. मायबोलीवर हॉलंडच्या ट्युलिपच्या बागेचे फोटो पाहिले आणि आमची हॉलंड प्रवासाची तयारी सुरु झाली... ही सिलसिला फेम बाग वर्षातले दोन महिनेच चालू असते. या वर्षी २१ मेला बंद होणार होती. आम्ही अगदी शेवटच्याच दिवशी ती बघणार होतो. हॉलंडबद्दल मायबोलीवर माहिती काढतानाच एका मैत्रिणीनी चार दिवस ...