उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

जशी सुट्टी सुंदर असायची तशाच शाळेतल्या काही गोष्टीदेखील होत्या. मी दहा वर्षांची असताना माझी शाळा बदलली. आधीच्या शाळेत माझी खूपच वट होती त्यामुळे अचानक पुन्हा मी "कुणी नाही" या पदावर आल्यामुळे खूप त्रासले होते. तशा मला काही मैत्रिणी होत्या पण अजून जिवाभावाचं कुणीच नव्हतं. नव्या शाळेतली पहिली दोन वर्षं दर सोमवारी माझ्या हृदयावर एक मोठ्ठा दगड येऊन बसायचा. उठल्या उठल्या शाळेला जायचं या विचारानं माझे डोळे भरून यायचे. आणि शाळेची वेळ जशी जवळ यायची तसे माझे पाय कुठल्यातरी अदृश्य ओझ्याने जड व्हायचे. शाळेतला "तिचा" गट मात्र शाळेच्या घंटेची आतुरतेने ...
पुढे वाचा. : अमेया