चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
बिजिंग महानगराच्या उत्तर परिमितीवर, टॅन्जिआलिंग(Tangjialing) या नावाचे एक खेडेगाव आहे.आज या खेडेगावाचे स्वरूप मुंबईमधल्या धारावी सारखी एक झोपडपट्टी असेच झालेले आहे. मूळ 3000लोकांच्या या वस्तीत आता दाटी वाटीने 50000 लोक रहात आहेत. या पैकी बहुसंख्य तरूण सुशिक्षित आहेत. बरेचसे लोक इंजिनीअरिंगचे पदवीधर सुद्धा आहेत. हे सर्व लोक मोडक्या तोडक्या इमारतींमधे छोट्या छोट्या खोल्यांच्यात रहातात. आजुबाजूच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात घाण व केरकचरा पडलेला असतो. असे असूनही या खोल्यांची भाडी काही कमी नाहीत. बिजिंगच्या थंडीला तोंड देण्यासाठी, घर ...