सरमिसळ येथे हे वाचायला मिळाले:
रेल्वे स्टेशन, पहाटेत दाट धुक्याला कापत दूरवरून येणारी ट्रेन... त्याला हीच गाडी पकडायची आहे. ट्रेन स्टेशनमध्ये शिरते. काही क्षण थांबते आणि निघते. तो अजून पोहचलेलाच नाही. ट्रेन जरा वेग धरते आणि तो दम टाकत स्टेशन मध्ये शिरतो. जिवाच्या आकांताने ट्रेनच्या मागे धावत सुटतो. गाडी पुढे.. तो मागे. गाडीचा दरवाजा पकडण्यासाठी तो हात पुढे करतोय पण दरवाजाची पकड काही हातात येत नाही... तेवढ्यात त्या दरवाज्यातून एक गोरापान, नाजूक हात बाहेर येतो आणि गाडीत चढण्यासाठी त्याला हात देऊ करतो.. तो पळता पळता भांबावतो पण लगेच स्वत:चा हात ...