नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:
शनिवार 13 फेब्रुवारीचा दिवस. नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरू होते. संध्याकाळचीच ड्युटी होती. मीटिंग वगैरे आटोपून बातम्या सोडण्याची नेहमीची कामे सुरू केली होती. तेवढ्यात आमच्याच सहकाऱ्याचा एसएमएस आला. कोरेगाव पार्कमध्ये स्फोट होऊन चार ठार झाल्याचा. जर्मन बेकरीत सिलिंडरचा स्फोट, एवढंच कळलं होतं. त्यानुसार पुढचं नियोजन ठरणार होतं. आठच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जाईपर्यंतही सिलिंडर स्फोट, एवढंच त्याचं वर्णन होतं.कॉन्फरन्स सुरू असतानाच स्टोरी डेव्हलप होऊ लागली ...