नरेंद्रजी विषय एकदम महत्त्वाचा, मांडणी उत्तम.

आजचे गुरुकुल, शाळा, महाविद्यालये ह्यातील कोणते शिक्षण हा प्रकार अभ्यासक्रम ठरवते. अभ्यासक्रम सरकार दरबारी पोसलेले, नेते धार्जिणे मंडळी ठरवते. सरकार व नेते जागतिक अर्थकारण व राजकारण ठरवते. म्हणून हा सगळा घोळ आहे. ह्याची सुरुवात जागतिक सत्ता मिळवणे ह्या उद्देशातून झाली. म्हणून आक्रमकांनी भारतीय शिक्षण पद्धती वर आक्रमण करून त्यात बदल घडवून आणला. अशा शिक्षितांनाच महत्त्व देऊन त्या शिक्षणालाच मान्यता दिली.

गुरुगृह एक मोठे मर्यादित कुटुंब असते. तो कुटुंब प्रमुख ह्या कुटुंबात इतर पाल्यांना सामावून घेतो. ह्या कुटुंबाच्या अस्तित्वाची जबाबदारी खेड्यातील गावकरी, पंचायत मंडळी ठरवते. त्या गावाला आवश्यक असणारे  कुशल मनुष्यबळ उभे करणे ह्या गुरुगृहाचे काम. तिथला तो गुरू ठरवणार कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे. मग तो उगीचच त्या पाल्याला त्या गावाशी संबंधीत नसलेले विषय शिकवण्यात स्वतःचा व त्या पाल्याचा वेळ वाया घालवत नाही.

ज्याला वेगाने बुद्धीचा वापर करण्याची क्षमता प्राप्त आहे अशाच पाल्याला त्याच्या बुद्धीला पेलणाऱ्या गुरुकडे पाठवले जात होते. आज पाठांतर क्षमतेला "हाय आयक्यू " वगैरे ठरवले जाते, कैक उदाहरणे रोज बघायला मिळतात. परीक्षा पद्धतीचा घोळ पाल्याला नैराश्याच्या घोळात  ढकलतो.   वर्ष भरात वाचलेल्या पाठ्यक्रमातून कोणत्या प्रश्नाला कोणते उत्तर द्यायचे हे युक्त्या वापरून शोधून काढतो. जास्तीत जास्त गुण मिळवण्यात सगळे कुटुंब वेळ व शक्ती खर्च करते. ज्ञान मिळवणे हा उद्देशच नसतो. त्यामुळे आवश्यकता नसताना दर वर्षी काही लाख विविध अभियंता, वाणिज्य, कला वगैरे विषयातून पदवीधर, मास्टर, डॉक्टर, डॉकरेट प्रशस्तिपत्रे मिळवून कामाच्या शोधात भटकताना दिसतात.

एकच उत्तर, गुरुगृह जे गावाच्या, शहराच्या, प्रदेशाच्या, देशाच्या गरजा व समस्यांचे समाधान शोधू शकतील असे मनुष्यबळ घडवू शकेल, घडवेल असे प्रशिक्षण देणारे असेल. मग गाव रिकामे होणे, शहरातील गर्दीची समस्या भेडसावणार नाही. मला सांगा ह्या देशाला किती विविध अभियंता, वाणिज्य, कला वगैरे विषयातून पदवीधर, मास्टर, डॉक्टर, डॉकरेट धारकांची आवश्यकता आहे. मग प्रशिक्षित कामगार / नेते / राजकारणी कसे,  कोठून मिळणार?