सबमिटसाठी  दाखल, सादर, सुपूर्त, स्वाधीन; प्रविष्ट; समर्पित, अधीन, शरण वगैरेंपैकी  एखादा शब्द संदर्भानुसार वापरता येईल.

मच्छिंद्र कांबळींच्या 'पति माझे छत्रपती'चे नाव बदलून 'पति माझे छत्रीपती' असे करायला लागले होते. त्यावेळी मराठा महासंघातर्फ़े असे कारण  सांगितले होते की, 'छत्रपती' फ़क्त शिवाजी महाराज होते अन्य कोणी नाही!'. परवा कोल्हापूरला ज़ाण्याचा योग आला होता, तिथे तर 'छ.' हे बिरूद अनेक स्त्री-पुरुषांच्या( छ. ताराबाई, छ. शाहूमहाराज वगैरे)  नावाआधी लावलेले दिसले.
' डॉक्टर' या प्र.के. अत्र्यांच्या नाटकाचे आधीचे नांव 'डॉक्टर लागू' होते, ते  लागू कुटुंबीयांच्या विनवणीस मान देऊन बदलण्यात आले होते..