रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:

मला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्‍यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळी उन्हात आरसा समोर ठेउन दाढी करत असत. त्यांच्या दाढी करण्याला एक वेगळीच नजाकत होती. आधी सगळी तयारी करायची मग चहा प्यायचा. जणु काही दाढीच सामान भिजत ठेवलय आणि मग सतरंजीवर बसुन दाढी करायची. माझ्या वडिलांना भरघोस मिश्या आहेत. मुच्छाकडा मिश्या नाहीत पण अनिल कपूर सारख्या. त्यांना छान दिसते मिशी. मला ही तसलीच मिशी हवी होती. बाबा दाढी वाढवत नसत. पण मला माहिती होत कि मला दाढी कोणासारखी हवी होती ती - शेखर कपूर. ...
पुढे वाचा. : गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)