फारच छान! पुढचं प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन नाही केलं तरी चालेल इतकं खुमासदार वर्णन. इतके जीवाभावाचे मित्र मिळणं आणि त्यांच्या सोबत असा मस्त प्रवास करायला मिळणं हीच खरी भाग्याची गोष्ट!
तुमची पदार्थांची वर्णनं तरी किती अचूक आणि मस्त असतात. मलाही असं फिरायला आवडतं, पण पूर्ण प्रवासभर, आणि विशेषतः घाटात मला इतकं मळमळ होत असतं आणि इतकं डोकं दुखू लागतं की चित्त थाऱ्यावरच राहत नाही.. ना काही खावसं वाटत ना कुठे आजू बाजूला बघावसं वाटत! कधी एकदा मुक्कामाचं ठिकाण येईल असं होतं!