अत्र्यांनी लिहिलेल्या मृत्युलेखातले अंश निव्वळ अप्रतिम.  वाचत राहावी अशी मराठी.

अगदी खरे. अत्र्यांच्या भाषेत नेमकी अशी काय जादू आहे, काय सूत्र आहे कळत नाही. मात्र मूळ व्यक्ती/विषय कितीही साधा, अपरिचित (प्रसंगी रसहीनही) असला तरी अत्र्यांनी त्यावर लिहिलेले वाचताना अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला होते. कदाचित भाषा अत्यंत सोपी, ओघवती आणि जीव ओतून लिहिलेली असते हेच अशा परिणामाला कारणीभूत होत असावे.