ह्याच वृत्तातील आणखी गाणी म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा', 'ऐ दिल मुझे बता दे'. पण कृपा करून केव्हा तरी पहाटे हे गाणे सारे जहाँ से.. च्या चालीवर किंवा उलट कोणीही कधीही म्हणू नये!
सहमत! गाण्याला चाल लावताना गाण्याच्या वृत्तापेक्षा गाण्याची वृत्ती(! ) जास्त महत्त्वाची असते/असावी असे वाटते.प्रत्येक संगीतकार हा एखादे काव्य वाचून त्याला एक संगीतकार म्हणून ते काव्य जसे भावते तशी तो त्याला चाल लावतो आणि एका चांगल्या गाण्याची निर्मिती होते.