भाषक म्हणजे मातृभाषा असणारा.  मराठीभाषक म्हणजे ज्याची मातृभाषा मराठी आहे असा.
भाषिक म्हणजे भाषेसंबंधी, भाषेचे, भाषेवरून इ. भाषिक विज्ञान म्हणजे भाषाशास्त्र, लिंग्विस्टिक्स. भाषिक मतभेद=भाषेवरून मतभेद.
भाषिक(भाषेच्या-बोलण्याच्या) मर्यादा, वगैरे.
भाषी म्हणजे बोलणारा. उदाहरणार्थ, दुभाषी, बहुभाषी, मृदुभाषी, इंग्रजीभाषी(=ज्याला इंग्रजी बोलता येते असा.).
भाषीय म्हणजे (विशिष्ट)भाषेचे. जसे, जर्मनभाषीय ज्ञान.
भाषित म्हणजे बोललेले. उदा. सुभाषित.
भाषण म्हणजे बोलणे, व्याख्यान.
संभाषण म्हणजे संवाद.
भाष्य म्हणजे एखाद्या साहित्यरचनेवर किंवा घडून गेलेल्या गोष्टीवर केलेली टीका/टिप्पणी.
भाष म्हणजे वचन. सुभाष म्हणजे चांगले वचन.
याव्यतिरिक्त भाष्यकार, भाषांतर(कार), भाषावार, भाषेनुसार, भाषाभगिनी, भाषाभिमानी, भाषाद्वेष्टा, भाषाधुरंधर, भाषाप्रभू वगैरे.