बीटी वांग्यातील विषद्रव्ये (वनस्पतीने मातीतील बॅक्टेरियाला जनुकात कृत्रिम रीतीने दाखल केल्यावर केलेला बचाव), त्याची माणसाला कोणत्या प्रकारे ऍलर्जी येऊ शकते, जमीनीवर व पर्यावरणावर दूरगामी परिणाम काय काय होऊ शकतात ह्याचे शास्त्रज्ञांना अजूनही समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. केलेल्या चाचण्या त्या दृष्टीने अपुऱ्या आहेत हेच पुढे आले. अशा वेळी त्या वांग्याला भारतीयांना खायला घालून, त्याचे उत्पादन घेणे म्हणजे आपल्या पायावर स्वहस्ते कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे.