मालिका खूप आवडली. पण खेद एकाच गोष्टीचा वाटतो आहे की लेखातील आई-वडील आणि मुलाच्या हळुवार नातेसंबंधावर चर्चा करण्याऐवजी सगळे प्रतिसाद वेगळ्याच दिशेला वळले आहेत.

कुणालाच असे सांगावेसे नाही की ज्याप्रकारचे हळुवार नाते लेखात फुलवले आहे; तसेच हळुवार नाते आम्ही आमच्या मुलांबरोबर निर्माण करून त्यांच्या आणखीन जवळ जाऊ. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू.

<<<ओ ड्युड हे नाव दिलं कारण तो अमेरिकेत, परदेशात वाढणारा मुलगा आहे आणि तो नेहाला त्याच्या मनातलं सांगतो. अरे मित्राला येथे ओ ड्युड म्हणतात म्हणून तरुण वयाला शोभणारं नाव दिलं.  ...........   मुलांचं आयुष्य कल्पनेपेक्षा वेगळं आहे हे समजल्याची खूप ई मेलस आली. हाच तर माझा हेतू होता की खरं जीवन कळावं. >>> १००% सहमत.

आपल्या लोकांच कसं असत "चीत भी मेरी पट भी मेरी" म्हणजे अमेरिका तर हवी पण मुलांवर तिथली छाप पडायला नको. हल्लीच्या COLLAGE ला जाणार्या मुलांकडे पाहिल्यावर तर अमेरिका इथेच अवतरल्यासारखी वाटते.

असो..... मला मात्र लेखमाला फार आवडली....

(इथे कोणालाही दुखावयाचा हेतू नाही......)

पुढील भागाच्या प्रतीक्षेत