बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
केलवा बीच,(माहिम) पालघर जवळ येथे सहलीला गेलो होतो.समुद्रावर मजा करण्यास गेलो.लाटावर स्वार होत सर्वासह दंगामस्ती केली.भिजुन झाल्यावर क्रिकेट खेळलो.मजा आली.सुरुच्या बागेतुन बाहेर पडत होतो.दोन्ही बाजुला फेरीवाले स्थानिक गोष्टी विकत होते.नारळाचे पाणी व ताडगोळ्यांची चौकशी करुन पैशाचे ठरल्यावर मी ताडगोळे खाण्यास सुरुवात केली. त्यावेळेला माझा एक मित्र सर्वाना बटाटेवडे वाटत होता. भुक लागल्याने इतर मडंळी आवडी खात होते. तो वाटत वाटत माझ्याजवळ आला आणि त्याने मला वडे देउ केले.माझे ताडगोळे खाण्याकडे लक्ष होते.त्याने देउ केलेले वडे मी नाकारले.तो पुन्हा ...