वेगळाच बाज असलेली नागपुरी कविता आवडली.
कवितेत वापरलेली 'घेवून, न्हावू, खावू' ही रूपे 'भाऊ' सारखीच असूनही ती अशा प्रकारे लिहिण्यात काही भाषिक वैशिष्ट्य आहे काय?
कवितेच्या शीर्षकात असलेला 'फटका' हा शीर्षकाचा भाग की इथे 'फटका' हा काव्यप्रकार ध्वनित होणे अपेक्षित आहे?
'फटका' काव्यप्रकाराच्या वैशिष्ट्यांबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?