छायाजी, अभिप्रायाबद्दाल आभारी आहे.
कवितेत वापरलेली 'घेवून, न्हावू, खावू' ही रूपे 'भाऊ' सारखीच असूनही ती अशा प्रकारे लिहिण्यात काही भाषिक वैशिष्ट्य आहे काय? 
नाही. तसे काही नाही.
कवितेच्या शीर्षकात असलेला 'फटका' हा शीर्षकाचा भाग की इथे 'फटका' हा काव्यप्रकार ध्वनित होणे अपेक्षित आहे?
नागपुर आणि आसपासच्या काही जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा एक आगळी बोलीभाषा आहे. ही भाषा वर्‍हाडी,झाडी मध्ये पण मोडत नाही. त्यामुळे या प्रकाराला मी वेगळे नाव दिले.'नागपुरी तडका/फ़टका' हे नांव बरे वाटले म्हणून दिले. फटका या काव्यप्रकाराबद्दल मला काहीच माहीत नाही.