खरे म्हणजे चाणाक्ष मनोगतींना हे गाणे ओळखायला खूप सोपे जाईल असे मला वाटले होते. पण इतक्या वेळ कुणीच उत्तर दिले नाही म्हणून मी चिंतेत होतो.

तुम्ही उत्तर अगदी बरोबर ओळखले आहे. तुमचे अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.

आता तुमच्या शंका.

... याचा अनुवादच नाही. ते का हे ही कळले नाही

तुम्ही पहिल्यांदाच भाग घेत आहात. माझे हे जवळ जवळ पन्नासावे भाषांतर आहे. (एकदा मोजायला पाहिजेत ) सुरवातीला सगळे भाषांतर प्रकाशित होत असे. आणि सदस्य ते लगेच ओळखत. त्यावर कोडे अवघड करण्यासाठी मनोगती विज्ञ सागर लिमये आणि कूटसम्राज्ञी मेघना नरवणे ह्यांनी असे सुचवले की ध्रुवपद आधी उघड करू नये. कडव्यांच्या भाषांतरावरून गाणे ओळखता आले तर तो दोघांचाही कस लागेल. ओळखणाऱ्याच्या पाठांतराचा आणि माझ्या भाषांतराचा. म्हणून ध्रुवपदाचे भाषांतर काही दिवसांनी उघड करण्यात येते.

मला ही गा लगा गा लगागा ची भाषा काही कळली नाही. हा काय प्रकार आहे?


गा म्हणजे गुरु अक्षर ल म्हणजे लघु अक्षर
तसे लिहिले म्हणजे ध्रुवपदाची चाल काय आहे ते समजायला सोपे जाते.

असो.

तुम्ही पहिल्यांदाच भाग घेतला आणि उत्तर सगळ्यांच्या आधी ओळखलेत!

 असाच लोभ राहू द्यावा.