तात्या,

वा! अनेक गाणी आठवली यामुळे. रोशनबद्दल तुम्ही जरा अजून लिहायला पाहिजे होतं असं वाटलं.

रफीचंच 'फिर मिलोगे कभी' हे यमनमधलं अजून एक अप्रतिम गाणं. (वो जब याद आए हेही .. यमन कल्याणचा शुद्ध म ठासवणारं, एल. पी. चं).

श्रद्धांजली या ध्वनिफितीत लता मंगेशकरनं हे पूर्ण गाणं अप्रतिम गायलंय. (माझ्या मते रफीपेक्षाही).

रफी तुकड्या-तुकड्यांमध्ये आवडतो. मन रे, कभी खुदपे (हेही लता मंगेशकरनं गायलंय) मध्ये तसंच 'दूर रहकर ना करो बात' या बागेश्रीतल्या गझलेत मात्र तो अप्रतिम वाटतो. एहसान तेरा (पुनः यमन)मध्ये मात्र एह - सान हे तोडणं फार खटकतं.

- कुमार