मिलन,

आशय नेहमीप्रमाणेच चांगला आहे. मात्र गझलेत मात्रादोष असू नयेत.

आरसे भलतेच मागू लागले
आमुचे चेहरेच मागू लागले! (चेहरेच या शब्दात एक मात्रा जास्त आहे. )

बोललो इतकेच मी, "का मारता? "
ढाल छळणारेच मागू लागले!

ना कुणी काट्यांस वाली राहिला,
फुल देव्हारेच मागू लागले! (फुल हा शब्द फूल असा यायला हवा आहे. )

मागणाऱ्यांना जरा सौजन्य नाही, (नाही या शब्दामुळे दोन मात्रा जास्त येत आहेत. 'ना' असेही चालते. )
दान प्राणांचेच मागू लागले!

काल जे गेले दिलासे देऊनी (उ पहिला यायला हवा, दीर्घ नाही. )
मोल त्यांचे तेच मागू लागले! (व्वा! मस्तच शेर)

जे कधी जगलेच नाही मोकळे, (सुंदर मिसरा! )
प्रेमही हलकेच मागू लागले!

काय मी झोळी धरू त्याच्यापुढे?
भीकही सगळेच मागू लागले!

अनेक शेर छान आहेत. मात्रादोष मात्र जायला हवेत.

चु, भु. द्या. घ्या.