माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
तो दिवस अजुनही तसाच लक्षात आहे जेव्हा कळलं की माझ्या पोटात तू आलायस...आणखी काही आठवड्यांनी तर व्यवस्थित डोकं, हात पाय असं सावलीसारख्या काढलेल्या लहानशा चित्रासारखं तुझं रुप पाहुन विश्वासच बसत नव्हता की अरे हे तर माझ्याच शरीरात वाढतंय...मग एक चाळा सुरू झाला.वाटायचं प्रत्येकवेळी डॉक्टरने तुला दाखवावं. पण ते तसं नसतं मग पाच-सहा महिन्याचा खरं उण्या म्हणजे वजा पाच-सहा महिन्याचा म्हटलं पाहिजे तेव्हा तुला पाहताना तुझं ते अंगठा चोखणं पाहून पुन्हा ...