तुम्ही म्हणताय ते खरं आहे.... जर एखादे मोठे वाहन समोर असते तर तेच केले असते. पण त्या रात्री वाटेत सुरुवातीचा ट्रक आणि पलीकडच्या बाजूने येणारी तुरळक वाहने सोडली तर बाकी वर्दळ शून्य होती. समोरून येणाऱ्या वाहनाचे दिवेही दिसतीलच ह्याची धुक्यामुळे काहीच शाश्वती नव्हती.
दरडींमुळे रस्त्याचा डोंगराच्या बाजूचा भाग रहदारीतून वगळूनच सर्वजण गाडी हाकत असल्यामुळे रस्ता अजूनच चिंचोळा झालेला होता. आणि खरं सांगायचं तर ड्रायव्हरचा नर्व्हसपणा पाहून आम्ही सगळेजण आतल्या आत दणकलो होतो. पण वेळ निभावून नेली, इतकेच!