आजचा लेख फारच छान आहे. खरोखर आवडला. अमेरिकी मुले-मुली नाहीत, पण निदान मुलांचे मूळ महाराष्ट्रीय असलेले पालक वाचतीलच.
याही लेखात लेखनाच्या त्रुटी थोड्याफ़ार आहेतच. विशेषतः इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिताना. पण यांत काही नवीन नाही. मराठीत रूढ न झालेले इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहिताना मराठी शुद्धलेखनाचे नियम अनवधानाने वापरले ज़ातात आणि लेखनात असे दोष अवतरतात. पण आता चुकीचेच वाचायची सवय होऊ लागली
आहे. स्त्रियांच्या केशकर्तनालयांवर ब्यूटि हा शब्द ब्युटी(उच्चार
ब्युटीऽऽ)
असा लिहिला नाही असे एकतरी सलून दाखवावे. तसाच शिकवणीच्या वर्गाच्या पाटीवर रंगवलेला ट्युइशन हा शब्द! पाटी देवनागरीत असो की रोमन लिपीत, चुकीचाच असणार! मराठी लोकांना एकवेळ मराठी येत नाही हे समजण्यासारखे आहे, पण साधी-सोपी इंग्रजीही येऊ नये?
आता लेखातले किरकोळ टंकनदोष : ''आय जस्ट कान्ट वेट टू टॉक टू यु" यांतले 'टु ', जरी 'ट' असे नाही, तरी 'टू' असे दीर्घ ऊकारान्त लिहायला नको होते. तसेच दोनदा लिहिलेला 'यु'. हाही 'यू' हवा होता.
इंग्रजी शब्दकोशांतल्या देवनागरीत दिलेल्या उच्चारांमुळे इंग्रजी शब्दातले अन्त्य अकारान्त अक्षर, उच्चारकोशाखेरीज अन्य लेखनात लिहितानासुद्धा, पाय मोडून लिहायची सवय आपल्याला लागली आहे. मराठी शुद्धलेखनाच्या चौदाव्या नियमानुसार असे करायला मनाई आहे. लेखातल्या ''रूट्स " या शब्दातल्या ट ऐवजी 'स'चा पाय मोडला की उच्चार Rootuss असा होतो हे ध्यानात घेतले की शेवटून दुसऱ्या अक्षराचा पाय न मोडता केवळ शेवटच्या अक्षराचा पाय मोडण्याची हिंमत होत नाही. असे सदोष लेखन हिंदीत का दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. असो, केवळ नाइलाज़ाने का होईना, Cotuss,Pantuss, Sweetus असे उच्चरण होणाऱ्या मराठी पाट्या आपण रोज़ वाचतोच की! --अद्वैतुल्लाखान