थोडं माझंपण... येथे हे वाचायला मिळाले:
करिअर करण्यासाठी म्हणून पूण्यात आलेला मी, पूण्यात गेली 5 वर्षापासून बॅचलर लाॅईफ जगतोय, हो.... हो.... हो.....बरोबर बॅचलर म्हटल की ‘मस्ती’, ‘आजादी’, ‘खुलेपण’, ‘अॅश’ हे सर्व ठिक आहे, पण ‘ज्याच जळत त्यालाच कळत’ त्यातला हा भाग आहे असो. तसा मी घरातला पहिलाच व्यक्ती, की ज्यांने गावाबाहेर ‘झेंडा’ गाडला, पण एकटयाने राहणे खरच किती अवघड असते, याचा प्रत्यय मला क्षणोक्षणी येतोय. घरातलं ‘शेंडेफळ’ असल्यामुळे किचनचे ‘महाभारत’ काय असते? हे कधीच कळले नाही,