चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
एक चोर आपल्या चुरापावचे लचके तोडून शेजारच्या गल्लीत विकतोय असं आम्हाला समजलं. "अच्छा काय चोरलं? कविता का? बरं" असं नेहमीसारखं वाटलं मला. आता काही दिवसांनी आपलीच कविता आपल्याला मेल येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. मित्र म्हणाले झाप त्याला. झापणे आपल्याला झेपणे नाही, पण म्हटलं निदान ही कविता माझी आहे असं सांगूयात त्या चोराला. पण उत्तर आलं "थिंक बीफोर सेईंग एनिथिंग". च्यायला म्हटलं हा प्रकार जाम धमाल वाटतोय. याची भन्नाट पोस्ट होऊ शकते. झापू तर शकत नाही निदान चोराला डिवचून डिवचून त्याच्या मनातलं बाहेर येतय का? किंवा त्याचं मन बदलता येतं ...