उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
लहानपणी नेहमी जुलै महिना सुरु व्हायची मी खूप आतुरतेने वाट बघायचे. एकवीस जुलैला माझा वाढदिवस असतो. तो जवळ येईल तशी माझी कळी खुलत जायची. पण जुलैतला पाऊस आईला मात्र बेजार करून टाकायचा. माझ्या वाढदिवसाची तयारी नेहमी लक्ष्मी रोडवरचा चिखल तुडवत सुरू व्हायची. पावसाचं ते बालिश किरकिर करणारं रूप माझ्या मनाच्या कोपर्यात खूप खोलवर रुतून बसलं आहे. जशी मी होते तसाच पाऊस होता. मधेच पिरपिर करणारा, मग मनासारखं झालं नाही की बळंच आभाळ काळं करून रुसून बसणारा! कधी आईनी महागाचा फ्रॉक घ्यायला नकार दिला की धो धो कोसळणारा. पण कसाही असला तरी तेव्हा मला पाऊस फार ...