अखियोमे छोटे छोटे..(येथे
ऐका) एक अतिशय सुंदर अंगाई गीत..
दिदि काही
वेळेला इतकं सुरेख गाते की त्याचा त्रास होतो. पार हळवे करतात तिचे
स्वर!
आपण
खरंच एखाद्या लहानग्याला झोपवताना ज्या लयीने त्याला हाताने थोपटू, अगदी
तीच लय पंचमदांनी या गाण्याला ठेवली आहे. खूप मोठा
माणूस!
अखियोमे छोटे छोटे सपने सजायके, बहियोमे
निंदियाके पंख लगायके
अगदी
थोपटल्यासारखी, काळजाला हात घालणारी चाल..केवळ ममत्व! 'सजायके' आणि
'लगायके' या शब्दांतल्या शुद्ध गंधाराकरता शब्द नाहीत! आणि 'चांदनी रे
झूम' मधला शुद्ध मध्यम? हा मध्यम गाण्याला क्षणात एका उच्च दर्जावर नेऊन
ठेवतो...!
सुंदर शब्द, पंचमदांची केवळ अप्रतिम चाल, दिदिची
गायकी. खूप जीव लावतात ही गाणी. हेच गाणं गुरुवर्य किशोरदांनीही तेवढ्याच
सुंदरतेने गायलं आहे हे वेगळं सांगायला
नको..