खानाला बजावत नाहीं कीं संवेदनाशील विषयांवर भकूं नकोस म्हणून. जें बंधन नेत्यांवर आहे तें खानाला नाहीं कां? सरकारला खानाचा एवढा पुळका कां? सेलिब्रिटींनीं विधानें जबादारपणें करूं नयेत कां? माझ्या मतें सेनेच्या नेत्यांना जाणीवपूर्वक प्रक्षोभित केलेजं गेलें आहे. दे हॅव बीन इंटेन्शनली अँड डेलिबरेटली प्रोव्होक्ड.
दुसरी गोष्ट म्हणजे टुकार चित्रपटांना आपण भरलेल्या करांतून जमवलेल्या पैशानें संरक्षण कां द्यावें? सेनेचा आवाज हा वीस टक्के जनतेचा असेल तर त्याविरुद्ध सरकारनें कां जावें? सरकार तर लोकसंख्येच्या जेमतेम १५ टक्के मतें मिळवून आलेलें आहे.
सुधीर कांदळकर