बहुधा लोकलमध्यें असावें. मीं कशाचें समर्थन करीत नाहीं पण पण उघड्यावर खाणें बरें नव्हेच.
प्रवासांत, कधीं कामाच्या गर्दींत बऱ्याच वेळां भोजनास वेळ मिळत नाहीं. तेव्हां डबा घरीं न्यावा लागतो वा चहापानाच्या वेळीं इतरांच्या मदतीनें खाऊन ऊडवावा लागतो. तेव्हां मात्र सणसणीत भूक लागते. कधीं एका काऱ्यालयीन पाहुण्याबरोबरच्या मीटींगनंतर नंतर तो परतण्यापूर्वींच दुसरा पाहुणा हजर असतो. अशा वेळीं तो खाणार नसल्यास आपल्याला खातां येत नाहीं. मग अशी मस्त भूक लागते. सहलींत तर आम्हीं दुपारच्या जेवणाऐवजीं सकाळीं ब्रंच घेतों. मग संध्याकाळीं मस्त भूक लागते.
सुधीर कांदळकर