छबिलदासमधलें नाटक. नेपथ्य नसलेलें. बहुधा एकांकिकाच. त्यांत एक निळू फुले छाप ऊस कारखानदार महाविद्यालयाच्या संस्थेचे संचालक असतात. ते प्राध्यापकाच्ची मुलाखत घेतात. त्याच्या मुलाखतीचा प्रसंग असाच इरसाल होता. प्राध्यापकाचें काम विहंग नायक यांनीं तर एका द्वाड विद्यार्थ्याचें काम तेव्हां उदयोन्मुख असलेल्या नाना पाटेकर यांनीं केलें होतें. नाटकाच्या मीं पाहिलेल्या प्रयोगाला अमोल आणि चित्रा पालेकर, माधव मनोहर, इ. मातब्बर मंडळी होती. सभागृहांत धूम्रपानास बंदी नव्हती.

चांगल्या लेखानें बऱ्याच वर्षांपूर्वींच्या मनोहर स्मृती जाग्या झाल्या. लग्नानंतर मीं सहकुटुंब पाहिलेलें पहिलें नाटक.

सुधीर कांदळकर