जेव्हा अशी कोणत्या गावी जायची वेळ येते तेव्हा तेथील सरपंच, उपसरपंच किंवा गावातील बुजुर्ग मंडळी ह्यांना आधीच संपर्क करून ठेवल्यास, कल्पना देऊन ठेवल्यास असा उपद्रव होत नाही. गावात आपल्या चांगल्यासाठी आलेल्या माणसांचे आदरातिथ्य, सन्मान करायची परंपरा अजूनही आपल्या खेड्यांत जपली जाते. काही गंभीर धोका असेल तर गावकरीच पूर्वसूचना देऊन सावध
करतात.
सहसा असा प्रश्न आजपर्यंत आला नाही व ह्यापुढेही येणार नाही असे वाटते.
तुम्ही दिलेली सूचना अतिशय महत्त्वाची आहे. धन्यवाद!
जेव्हा फक्त व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी जात असू तेव्हा फालतू धाडस उपयोगाचे नाही.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर बरोबर कायम असे कोणीतरी असतेच जे वेळेला उपयोगी पडेल.
आणि वारुडीजवळ स्नेह्यांचा मळा असल्याने व वारुडीत त्यांच्या परिचयाचे गावकरी असल्याने कोणताच धोका नव्हता! :-)