"समाज फाटतच चालला आहे. हा समाज पुन्हा एकदा एकात्म कसा होईल, ही चिंता विचारवंतांना पडली आहे. समाजाचा झालेला बुद्धिभेद सांवरायचा कसा? " हाच खरा प्रश्न आहे.
स्वार्थी, चिथावणीखोर, संकुचित मनोवृत्तीचे लोक आक्रमक होत आहेत. कुणी विरोध केला, तर त्याचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले जाते. जातीयवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार या चक्रव्युहात भले भले गारद होत आहेत.
स्वत: ला अध्यात्मिक म्हणवणारे व्यष्टी पलीकडचा विचार करायला तयार नाहीत. समाज, देश यांची काही बांधिलकी मानायाचीच यांची तयारी नाही. हे सगळेच विहंगम मार्गी! निराकाराला झोंबायला निघालेले आणि शून्यात पहुडायला आतुर झालेले. यांच्या लेखी राष्ट्रप्रेम म्हणजे संकुचितपणा, समाज हि एक कवी कल्पना, तो एकात्म कसा होईल याची चिंता करणे हा वेळेचा अपव्यय, भक्ती आणि उपासना म्हणजे थोतांड. यांचे असले पूर्वग्रह पण पवित्र. आणि ए सी मध्ये बसणाऱ्या, फुकट खाऊ आणि कुठलीच जीवननिष्टा (हा हास्यास्पद शब्द! सगळीच म्हणे लीला आहे) नसल्याने वारंवार तेजोभंग झालेल्या यांच्या international बुवाच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या श्रद्धा, निष्ठा कानटोपी किंवा चप्पल सारख्या काढून ठेवायच्या. त्या विना सत्याच्या मार्गावर प्रवेश बंद! असो. एकूण अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे.