मराठी अस्मिता येथे हे वाचायला मिळाले:
कधी कधी डोक्यानं विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे.