चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
सिनेमे किंवा नाटकांच्यात एक चावून चोथा झालेला प्लॉट नेहमी वापरला जातो. या कथानकात असलेला एखादा म्हातारा किंवा म्हातारी यांची आपल्या नातवंडाचे दोनाचे चार हात झालेले बघण्याची इच्छा असते. हा म्हातारा मरायला तरी टेकलेला असतो किंवा त्याची मोठी प्रॉपर्टी त्याच्या नातवंडाचे लग्न झाल्यावरच त्याला मिळणार असते. या नातवंडाची बंधनात अडकण्याची अजिबात तयारी नसल्याने तो आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा पैसे देऊनही कोणालातरी आपला भावी सहचर म्हणून पुढे करतो वगैरे वगैरे ........ आता चिनी म्हातारे काय? आणि भारतीय म्हातारे काय? सगळे ...