मारला पल्ला नाही तर गाठला पल्ला हवे; वृत्तातही बसतेच आहे. पल्ला गाठतात तर मजल मारतात, असे वाटते. 

पल्ला मारला असे मराठी साहित्यात म्हणतात.


कल्ला करणे हा वाक्प्रचार हे टिंगलटवाळी, मजा, टाइमपास, गडबड-गोंधळ, राडा इ. इ. अनेक शब्दांचे किंवा घटनांचे सर्वसमावेशक प्रातिनिधिक रूप म्हणून बोली मराठी भाषेत वापरले जात असले,  तरी येथे गझलेत वापरले गेलेले (मला तरी) खटकते आहे.

आपल्या म्हणण्याचा आदर आहे. मला काही खटकले नाही.


यमाच्या शेरात पहिल्या ओळीत गेयतेचे भजे झाले आहे

हा मुद्दा काही मला कळत नाही. गझल निर्दोष असल्यावर गेयतेचे भजे कसे होईल? आपण दूरध्वनी केलात तर मी गाऊन ती ओळ 'निर्विघ्नपणे' ऐकवू शकेन आपल्याला. निर्दोष गझलेत कोणत्याही ओळीच्या गेयतेचे 'भजे' होऊ शकत नाही ही किमान बाब लक्षात घ्यावीत अशी विनंती! (शेरच 'भजे' आहे म्हणालात तर आपल्या मताचा आदर आहे. )


पहिला आणि शेवटचा शेर आवडला. पहिल्या शेरात 'विसरावे' असा ऐवजी 'विसरा मला' हा हे अधिक प्रभावी वाटेल. चू. भू. द्या. घ्या.

'विसरा मला हा' हे वृत्तात कसे काय बसते सांगाल का? आपल्या सुचवलेल्या बदलात 'वृत्ताचे भजे' झालेले आहे. (हे विधान वैयक्तीक नसून आपण जे लिहिले आहेत त्याच धर्तीवर आहे. गझलेत 'गेयतेचे भजे' होण्यापेक्षा 'वृत्ताचे भजे' होणे जास्त गंभीर आहे.)

कृपया तांत्रिकदृष्ट्या चुकीचे सल्ले देताना दोनदोनदा तपासावेत अशी विनंती!