बऱ्याच वर्षानंतर पुष्करिणी भेळ खाली. रुपये २० फक्त. द्रोणात देतात. पूर्वी बहुतेक स्टीलच्या ताटल्या होत्या. खाताना चित्त यांची आठवण झाली.
अरे वा. मलाही ह्या लेखामुळे पुष्करिणी भेळेची आठवण झालेली आहे.  तशी माझी आठवड्यातून एक वारी, शनिवारी किंवा रविवारी, असतेच. पण गेल्या २ आठवड्यांत जमलेले नाही. आज जातोच.

पुष्करिणी भेळ आणखी एक खासियत म्हणजे टमाटाविरहित आहे.  तसेच चिंचगुळाच्या पाण्यात तिळाचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तिखटपणा, गोडपणा, तिळाची चव, आंबटपणा  ह्या सगळ्या चवी  मोजून मापून.