बेफिकीर,

गझल आवडली... तुमच्या गझलांमधल्या सर्वोत्कृष्ट रचनांपैकी ही असावी. वेगळे शेर फार दिवसांनी वाचायला मिळाले. चित्तच्या गझलेचा उल्लेखही आवडला.

वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे - हा मतला फारच छान आहे.

रोज अनुभवतो तुझे... माझ्यासवे... लोकांमध्ये
’बेफिकिर’ गंधाळणे हे.. प्रेम जमल्यासारखे - हा मक्ताही आवडला. तखल्लुस चपखल.

एकमेकांना चुका माहीतही नसतात पण
चेहरे सवयीमुळे होती वरमल्यासारखे - सुंदर.

एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी
भेटतो आलिंगनी नुकतेच दमल्यासारखे.... सुंदर. 'नुकतेच' च्या ऐवजी 'नुसतेच' हवं होतं का?

- कुमार