देणाऱ्या विश्वामित्राने प्रतिसृष्टी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातून खेचर, तृतीय लिंगी (किंवा अलिंगी) प्रजा, म्हैस, तरसासारखे प्राणी तयार झाले, असे कांहीतरी पुराणकथेतून वर्णिले गेले आहे. या बी. टी. रोपणाचा प्रकार म्हणजे 'विश्वामित्री खेळ' म्हणता येईल. बॅसिलस् हे दंडाणूच्या प्रकारातील सूक्ष्म जंतू. हे जंतू माणसाच्या पचनक्रियेला पोषक ठरत नाहीत, असा कांही निष्कर्ष काढला गेला आहे कां, माहित नाही. मात्र मातीतून जे जंतू पोटात जातात, त्यावर प्रतिकारक उपचार करून घ्यावे लागतात, हे आपण पाहातोच. एकंदरीत, मला तरी वाटते की, बी. टी. चा प्रयोग नव्या कांही व्याधी माणसात रुजविण्यासाठी आणि त्यावर नव्या महागड्या औषधांचा ससेमिरा लावून देण्याकरता पाश्चात्यांचा नवा धंदा असेलही, काय सांगावे?