मध्यंतरी फ्रान्स देशात नव्या कायद्याने बुरख्याला पूर्ण बंदी घातल्याचे वाचनात आले होते.
जोवर भारतात बुरखा, घुंगट इत्यादी प्रकार आहेत तोवर चेहरा, मान, गळा (जिथे महिला सर्वाधिक दागिने घालतात, कोणी हल्ला केल्यास त्या भागाला नाजूक असल्याने जास्त इजा पोचते, ऊन - वारा - पाऊस - थंडीमुळे जेथील त्वचा बाधित झाल्यास त्रास होतो, प्रदूषणाचा मुद्दा आहेच! ) ह्या अवयवांना झाकणारे स्कार्फ/ ओढण्या गुंडाळण्यापासून महिलांना रोखण्यात काहीच हशील नाही असे मला वाटते.
राहाता राहिला सुरक्षेचा प्रश्न! अहो, इथे भर दिवसा अतिरेकी - दहशतवादी लोक बिनबोभाट हिंडतात, बॉंबस्फोट घडवून आणून पोबारा करतात, सिमीचे कार्यकर्ते उजळ माथ्याने शहरात वावरतात तिथे असल्या स्कार्फ-बंदीने नक्की काय साधणार?