गजलेतील विचार तितकेसे पटले नसले तरी गजल म्हणून आवडली.
रान आहे माजले शहरात या
रोज वणवे पेटले शहरात या...
 -छान.
शहर कसले हा तुरुंगच केवढा!
माणसांना डांबले शहरात या!...
 - शहरात माणसांना डांबलं जातं हे पटलं नाही. किंबहुना माणसं अर्थार्जनासाठी, प्रगतीसाठी, व गावाकडील भवितव्य अंधारमय असल्यामुळे झुंडीच्या झुंडींने शहरात येतात. गरज/निकड भागल्यानंतर ह्यातील  किती जण स्वेच्छेने पुन्हा गावी जातात?
दाखवा मज एक व्यक्ती 'सज्जन'
कोण आहे थांबले शहरात या..
 - फार पूर्वी कुठेतरी वाचलेला एक वाक्यांश आठवला : "नोस्टाल्गिया फॉर द फॅंटसी ऑफ अ रुरल आयडिल दॅट नेव्हर एग्झिस्टेड... ". शहरी माणसे लबाड, बेरकी, खलप्रवृत्ती व गावकरी साधे-भोळे, सज्जन, पापभिरू इत्यादी. जगाच्या पाठीवर कुठेही माणसं माणसंच असतात - चांगली, वाईट, व मधील सर्व ग्रे शेड्^स. पहिल्या ओळीतील 'सज्जन'चा उच्चार वृत्ताच्या गरजेमुळे सज्जनऽऽ असा करावा लागत आहे. त्याऐवजी 'दाखवा सज्जन इथे मज एकही' किंवा 'दाखवा सज्जन कुणी येथे मला' असे काहीतरी केले तर?
माणसे का धावती शहराकडे?
काय आहे ठेवले शहरात या?...
- शेर चांगला आहे पण वरचाच मुद्दा पुन्हा लागू होतो - विचार पटत नाही. काहीतरी ठेवले आहे म्हणूनच लोक येतात. शेवटी, "असतील शितं तर जमतील भूतं" हेच खरं.