प्रथम गझलेबाबत - गझल आवडली. मी एक प्रतिसाद सकाळी दिला होता पण तो दिसत नाही. सज्जन हा शब्द मात्र मिलिंदराव म्हणतात तसा योजला जायला हवा. ही गझल मंचीय पण आहे. मला या गझलेत नावीन्य वाटले. धन्यवाद!

मिलिंदराव,

आपली मते वाचली. मला त्यावर काही म्हणावेसे वाटले.

अत्यंत कमी जागेत कसेबसे राहावे लागणे किंवा गुदमरून आयुष्य कंठावे लागणे याला डांबणे असे म्हंटले असेल काय?

तसेच, शहरापेक्षा गावात शांतता जास्त मिळते, कटकटी कमी असतात व 'जर राहणीमानाचा मुद्दा गौण ठरवला' तर शहर गावापेक्षा चांगले या दृष्टीने तो शेर रचला असेल काय?

असे मला वाटले.

तसेच, आशय 'सर्वांना पटण्यासारखा' असावा अशी अपेक्षाही असावी की नसावी असेही मनात आले. म्हणजे, उदाहरणार्थ बाराखडीमध्ये म्हंटल्याप्रमाणे उगाचच शिवराळ वगैरे भाषा वापरू नये. पण एखाद्याला काही विशिष्ट मुद्दा समाजमान्य भाषेत मांडायचा असला व तो मुद्दा एखाद्याला न पटणारा असला तरी मांडला जावा असे वाटते. (अर्थात, आपण 'हे मांडूच नये' वगैरे म्हणालेला नाहीत याची पूर्ण जाणीव आहे. आपण फक्त स्वतःचे मत मांडले आहेत. ).

मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की गझलेतील आशय सर्वमान्य असण्याची अपेक्षा केली जावी काय? की न केली जावी?

माझ्यामते अशी अपेक्षा केली जाऊ नये.

गैरसमज नसावा.

धन्यवाद!