आसमंतात निरनिराळ्या प्रकारे, निरनिराळ्या अनुभवांत, निरनिराळी सुसंगती शोधण्याचे सर्वच प्रयत्न आनंददायी असतात.

मात्र एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सुसंगतीत तल्लीन असणाऱ्यांना इतर प्रकारच्या सुसंगती रसभंग करणाऱ्या वाटू शकतात.

अशांनी काय करावे?
आपल्याला जरी त्यात स्वारस्य, आनंद वाटत नसला तरीही
इतर विविध प्रकारे आनंदाचा शोध घेणाऱ्यांना नाउमेद करू नये.
दुर्लक्ष करावे. तुमचे काही फारसे बिघडणार नाही.
त्यांना मात्र विना रोकटोक निर्मळ आनंद उपभोगता येईल.