अत्यंत कमी जागेत कसेबसे राहावे लागणे किंवा गुदमरून आयुष्य कंठावे लागणे याला डांबणे असे म्हंटले असेल काय?
- मूळ शेर :
शहर कसले हा तुरुंगच केवढा!
माणसांना डांबले शहरात या!...
ह्यात साऱ्या शहरास तुरुंग म्हटले आहे, त्यामुळे असे वाटते की दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीस 'साऱ्या' हा शब्द अध्याहृत असावा. शहरात अनेक माणसे कमी जागेत राहतात हे खरे असले तरी त्यामुळे सारा शहर तुरुंग ठरत नाही. तसेच सारेच ग्रामस्थ काही प्रशस्त बंगल्यांमध्ये ऐषआरामात राहात नाहीत.
शहरापेक्षा गावात शांतता जास्त मिळते...
- शक्य आहे, पण
कटकटी कमी असतात...
- असहमत.
'जर राहणीमानाचा मुद्दा गौण ठरवला' तर शहर गावापेक्षा चांगले...
- हा मुद्दा गौण का ठरवावा?!
गझलेतील आशय सर्वमान्य असण्याची अपेक्षा केली जावी काय?
- माझी अशी कोणतीही अपेक्षा नाही. मला ही गझल गझल म्हणून आवडली हे मी माझ्या पहिल्या अभिप्रायाच्या पहिल्याच ओळीत म्हटले आहे. पुढे मांडलेले विचार व मुद्दे ही माझे वैयक्तिक मते आहेत, व चर्चा व्हावी ह्या उद्देशाने मांडली आहेत. जालचावड्यांवर चर्चा ह्या हव्याच, नाही का? सगळे सगळ्यांशी 'सहमत' असू लागले तर मजा काय?